Ram Mandir Donation Row | Ayodhaya अयोध्यातेतील राम मंदिराच्या दान चोरीच्या प्रकरणात अटक केलेला आरोपी आता बोलू लागल्यानं अनेक धक्कादायग गोष्टींचा खुलासा होऊ लागला आहे. आरोपी अविनाश शुक्ला याची चौकशी केली असता अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान जेव्हा अविनाश शुक्ला याला मागील ४५ दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं, तेव्हा तो पूर्णपणे खचला आणि त्याने देणगीतून सातत्याने चोरी करत असल्याची कबुली दिली. पोलीस आता या संपूर्ण नेटवर्कचा, चोरीच्या रकमेचा आणि यामध्ये सामील असलेल्या इतर लोकांचा तपास करत आहेत.
#rammandirdonation #DonationRow #Ayodhaya #marathinews #uttarpradesh